सानगडी हादरलं! शाळकरी मुलींना चाकूचा धाक – प्रशासन गप्प का?

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सानगडी गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. शाळेत जाणाऱ्या निरपराध मुलींना चाकूचा धाक दाखवून धमकावण्याचे प्रकार सातत्याने घडत असून, संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असताना, प्रशासनाची भूमिका मात्र संशयास्पद ठरत आहे.
शाळा सुटताना थरकाप उडवणारे प्रकार
स्थानिक माहितीप्रमाणे, सकाळी आणि दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेत ३ ते ५ अज्ञात इसम खुलेआम चाकू दाखवत “गाडीत बसा, नाहीतर जीव घेऊ” अशा धमक्या देत शाळकरी मुलींना रस्त्यात अडवत आहेत.
या घटनांमुळे मुली, पालक आणि शिक्षकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालक भयभीत – मुलींना शाळेत पाठवणं थांबलं
सतत घडणाऱ्या या प्रकारांमुळे अनेक पालकांनी आपल्या मुलींना शाळेत पाठवणं थांबवलं आहे. शिक्षणासारख्या मूलभूत अधिकारावरही या गुन्हेगारी प्रकारांचा थेट परिणाम होत असून, संपूर्ण गाव मानसिक तणावाखाली आहे.
पोलीस चौकी असूनही गस्त नाही?
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे – सानगडी परिसरात पोलीस चौकी असतानाही नियमित पोलीस गस्त दिसून येत नाही.
आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
“एखादी मोठी घटना घडल्यावरच प्रशासन जागं होणार का?” असा संतप्त सवाल पालक आणि ग्रामस्थ विचारत आहेत.
कारवाई नाही तर जनआंदोलनाचा इशारा
जर तातडीने आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देत आहेत.
तालुक्याची चिंता वाढली
सानगडीतील मुलींची सुरक्षा हा प्रश्न आता केवळ एका गावापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण साकोली तालुक्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे.
प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन कठोर पावले उचलावीत, अशी मागणी



