Latest News

फिमा प्रकरणात अनिल अंबानी पुन्हा ED समन्सला गैरहजर; ‘व्हर्च्युअल साक्ष’ देण्याची तयारी व्यक्त

रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी हे फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (FEMA) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) समन्सला सोमवारी (१७ नोव्हेंबर २०२५) दुसऱ्यांदा गैरहजर राहिले.

सूत्रांच्या माहितीनुसार, अंबानी यांनी व्हर्च्युअल स्वरूपात किंवा रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओद्वारे जबानी देण्याची विनंती केली होती. हीच मागणी त्यांनी १४ नोव्हेंबरच्या पहिल्या समन्सलाही गैरहजर राहताना केली होती. मात्र ED ने त्यांचा प्रस्ताव नाकारून १७ नोव्हेंबरसाठी नवा समन्स जारी केला होता, तरीही ते प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत.

या प्रकरणातील पुढील कारवाईबाबत ED लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button