चिखलदरा नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल प्रक्रिया उत्साहात; ३६ अर्ज दाखल

चिखलदरा : चिखलदरा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची नामांकन प्रक्रिया उत्साहात पार पडली आहे. १० ते १६ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठी १ तर नगरसेवक पदांसाठी तब्बल ३५ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. रविवारी एकट्याच दिवशी अध्यक्षपदासाठी १ आणि नगरसेवक पदासाठी १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली.
नामांकन प्रक्रियेदरम्यान विविध पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांचे मजबूत उपस्थिती दिसून आली. रविवारी दाखल झालेल्या नगरसेवक पदांच्या काही प्रमुख उमेदवारांमध्ये पुढीलप्रमाणे नावे आहेत:
- प्रभाग क्र. १ अ: धमेंद्र धांडेकर
- प्रभाग क्र. २ ब: शे. भिक्कन अब्दुल
- प्रभाग क्र. ३ अ: मोना कास्देकर
- प्रभाग क्र. ३ ब: अनवर हुसेन
- प्रभाग क्र. ४ अ: सुंदरबाई चंदन बेठे
- प्रभाग क्र. ४ ब: राजेश मांगलेकर
- प्रभाग क्र. ५ ब: राजू भालेराव
- प्रभाग क्र. ६ अ: लक्ष्मी मडावी
- प्रभाग क्र. ६ ब: प्रशांत गवई, सचिन गोळवे
- प्रभाग क्र. ७ अ: अनिल वानखडे
- प्रभाग क्र. ८ अ: मनिषा गजबे
- प्रभाग क्र. ८ ब: सुरेखा हाते
- प्रभाग क्र. ९ ब: मंजूश्री नरोले
दरम्यान, चिखलदरा नगराध्यक्ष पदासाठी भाजपने राजेंद्र सोमवंशी यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. या घोषणेनंतर स्थानिक राजकारणात चर्चांना वेग आला असून आगामी निवडणुकीत त्यांना कोणती सामना मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१६ नोव्हेंबरपर्यंत नामांकन प्रक्रिया शांततेत पार पडली असून अंतिम दिवशी दाखल होणाऱ्या अर्जांच्या संख्येकडे आता उत्सुकता आहे. यानंतर छाननी, अर्ज मागे घेण्याची मुदत आणि अंतिम उमेदवारांची यादी याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.



