बडनेरा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशी सोहळा

बडनेरा – बडनेरा नवी वस्तीतील शिक्षक कॉलनी परिसरात असलेलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर यंदा कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं भक्तीमय वातावरणात रंगणार आहे.
या सोहळ्याची सुरुवात १ नोव्हेंबर रोजी सकाळी भव्य पालखी सोहळ्याने होणार आहे. मंदिर परिसरातून निघणाऱ्या या पालखीत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होणार असून परिसरात विठ्ठल नामाचा गजर घुमणार आहे. पूर्वसंध्येला म्हणजे रविवार, २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता ‘कानडा राजा पंढरीचा’ या भक्तीगीत आणि भावगीतांच्या सुरेल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे अमरावतीतील सिंफनी ग्रुपचे सुप्रसिद्ध संगीत संयोजक सचिन गुडे यांच्या संयोजनात तयार होणारी ही संध्याकाळ. कार्यक्रमात यवतमाळचे ख्यातनाम गायक पूर्णाजी खानोदे, तसंच राजकुमार निंभोरकर आणि गायिका निशाताई वानखडे यांच्या गायनाने भक्तांना मंत्रमुग्ध करणार आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान, शिक्षक कॉलनी बडनेरा यांच्या वतीने या कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आणि या सोहळ्याची सांगता ३ नोव्हेंबर रोजी दुपारी भव्य महाप्रसादाने होणार असून, परिसर भक्तीमय आणि आनंदमय वातावरणाने भरून जाईल.



