Accident NewsLatest NewsMaharashtra

कफ परेडमध्ये चाळीला भीषण आग; १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, तिघेजण गंभीर जखमी

मुंबई (20 ऑक्टोबर 2025): कफ परेड येथील मच्छिमार नगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास एका चाळीत भीषण आग लागून १५ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही आग पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास लागली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात घबराट पसरली. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या दुर्घटनेत मृत झालेल्या मुलाची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. आगीचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू असून, यासंदर्भात अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button