citynewsNagpurNagpurCrimeNews

नागपुरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा; २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

भांडेप्लॉट सेवादल नगर परिसरातील कारवाई; सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नागपुरात अवैध दारूविक्रीविरोधात पोलीस आयुक्त पथकाने कारवाई केली आहे. मंगळवारी २२ सप्टेंबरच्या रात्री भांडेप्लॉट सेवादल नगर परिसरात छापा टाकत पोलिसांनी देशी आणि विदेशी दारूसह एकूण २५ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त पथकाचे एस्कॉर्ट पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान कोळी हे पथकासह शहरात पेट्रोलिंग करत असताना, भांडेप्लॉट सेवादल नगर परिसरात एक व्यक्ती देशी आणि विदेशी दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहितीची खात्री केली आणि सक्करदरा पोलिस ठाण्याच्या रात्री गस्तीवरील पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले.

दोन पंचांसमक्ष संशयिताच्या घराची झडती घेतली असता १५ हजार २७० रुपये किमतीची विदेशी दारू, ९० मिलीच्या २०० देशी दारूच्या बाटल्या, ज्यांची किंमत ८ हजार रुपये आहे, तसेच १ हजार ८०० रुपये रोख रक्कम असा एकूण २५ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी संदिप सूर्यभान उरकुडे, वय ४२ वर्षे, रा. भांडेप्लॉट सेवादल नगर, नागपूर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५(ई) अंतर्गत सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांची कारवाई सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button