AMCActionamravaticitynews

तपोवन गेट परिसरातील फ्लॅटला अचानक आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला

३० ते ४० मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण; एक्स्टेंशन लॅडरचा वापर

अमरावती : शहरातील तपोवन गेट परिसरातील प्रवीण रेसिडेन्सीच्या पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटला मंगळवारी, २२ सप्टेंबर रोजी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर सुमारे ३० ते ४० मिनिटांत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले.

२२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजून ४५ मिनिटांनी प्रवीण रेसिडेन्सीमधील फ्लॅटला आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फायर लॉरी क्रमांक MH 27 BX 6913 घटनास्थळी रवाना करण्यात आली. वाहनचालक संतोष डोईफोडे तसेच फायरमन निलेश काटपेलवार, आशिष चव्हाण आणि ज्ञानेश्वर चव्हाण यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याची मोहीम सुरू केली.

आगीची तीव्रता लक्षात घेता अग्निशमन मुख्यालयातून आणखी एक फायर लॉरी घटनास्थळी पाठवण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त फायर लॉरीदेखील घटनास्थळी रवाना करण्यात आली. जवानांनी विविध साधनांचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. या कारवाईदरम्यान एक्स्टेंशन लॅडरचाही वापर करण्यात आला.

सुमारे ३० ते ४० मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले. अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे आग अधिक पसरू न देता परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button