Accident NewsLatest NewsMaharashtra

समृद्धी महामार्गावर ट्रक उलटला, चालक किरकोळ जखमी

समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातील फर्दापूर शिवारात, चॅनेल नंबर २९४ वर शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला. नागपूरच्या दिशेने जाणारा एमएच-०४ एमएच-५९९३ क्रमांकाचा ट्रक अनियंत्रित होऊन उलटल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. अपघातानंतर वाहतूक एका बाजूने सुरू ठेवण्यात आली होती. मात्र क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला करताना दुपारी बाराच्या सुमारास नागपूरकडे जाणारी सर्व लेन काही काळासाठी बंद करण्यात आल्या.
या काळात दोन किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. प्रवासी व वाहनचालकांना सुमारे तासभर महामार्गावर थांबून रहावं लागलं.
दरम्यान, पोलिस कर्मचारी विकास कोळी, भुतेकर, एसएसएफ जवान आणि क्यूआरव्ही टीमच्या प्रयत्नांमुळे ट्रक बाजूला करण्यात आला आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
सध्या दिवाळीचा सण सुरू असल्याने मुंबई, पुणे भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या गावी परतत आहेत. त्यामुळे अशा अपघातांमुळे प्रवासात व्यत्यय येत असून, महामार्गावरील सुरक्षा व वेग नियंत्रणाची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button