Latest News
नंदनवन पोलीसांनी चोरीस गेलेला जप्त मुद्देमाल केला नागरिकांना परत

नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये आज खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिमंडळ क्रमांक चारच्या पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांच्या नेतृत्वाखाली, विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत जप्त केलेल्या मुद्देमालाचे वाटप मूळ मालकांना करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले, कारण दिवाळीच्या आधी त्यांना त्यांचा मुद्देमाल परत मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. परिमंडळ क्रमांक चारच्या पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी सांगितले की, या वाटपाचा उद्देश नागरिकांचा विश्वास वाढवणे आणि गुन्हेगारी रोखण्यास मदत करणे हा आहे.



