AmravatiamravatinewsLatest NewsMaharashtra

आपत्तीमधील मानसिक जखमा भरून काढण्यासाठी ‘मानसिक आधार’ गरजेचा – जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आवाहन

अमरावती : “आपत्ती ही अचानक येते, पण तिच्या जखमा खोलवर जातात. अशा वेळी जर प्रशिक्षित समुपदेशक, मानसोपचार तज्ञ, हेल्पलाईन्स आणि मदत केंद्रे जवळ असतील, तर मन पुन्हा उभं राहू शकतं,” असे भावनिक आणि समर्पक शब्दांमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. अंकिता भगत (यावले) व डॉ. हर्षद भगत, मानसोपचार व समुपदेशन तज्ञ, डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, अमरावती यांनी मानसिक आरोग्याच्या महत्वावर भर दिला.

मानसिक आरोग्य – प्रत्येकाच्या जीवनाचा मूलभूत भाग

प्रत्येक आपत्तीच्या वेळी भौतिक नुकसान होतेच, पण मानसिकदृष्ट्याही अनेकांचे जग उद्ध्वस्त होते. एखाद्या प्रियजनाचे निधन, घराचा नाश, रोजगार गमावणे किंवा आयुष्यभराच्या मेहनतीचा नुकसान होणे यामुळे भीती, चिंता, ताण आणि नैराश्य उद्भवू शकते.

डॉ. अंकिता भगत म्हणतात,

“आपत्तीच्या काळात फक्त वस्तू हरवत नाहीत… अनेकांची मनं हरवतात. म्हणूनच मानसिक आरोग्य सेवा नेहमीच उपलब्ध असायला हव्यात.”

मानसिक आरोग्याची गरज ओळखा

डॉ. हर्षद भगत यांनी नमूद केले की, “आपत्तीच्या काळात मानसिक आधार घेणे हे कमकुवतपणाचे नव्हे, तर सामर्थ्याचे लक्षण आहे. आपण भीती, गोंधळ, एकटेपणा किंवा निराशा अनुभवत असाल, तर लाज न बाळगता मदत घ्या. समुपदेशनाच्या माध्यमातून मनावरचा ताण हलका करता येतो.”

जागतिक मानसिक आरोग्य दिनाची आठवण

10 ऑक्टोबर रोजी पाळला जाणारा जागतिक मानसिक आरोग्य दिन आपल्याला आठवण करून देतो की:

“मानसिक आरोग्य ही आरोग्यव्यवस्थेची एक अपरिहार्य गरज आहे.
आपत्तीच्या वेळी मानसिक आधार तितकाच महत्त्वाचा आहे जितका अन्न, पाणी किंवा निवारा.”

आवाहन – मदतीचा हात पुढे करा

“तुमच्या मनाला विश्रांती हवी आहे का? भीती, ताण किंवा नैराश्य जाणवत असेल, तर मदत मागायला लाजु नका. आजच पाऊल टाका, मन हलके करा, आणि जीवन आनंदी बनवा!” असे आवाहन या दोन्ही मानसोपचार तज्ञांनी केले.

समुपदेशन व मानसिक आधारासाठी संपर्क:
डॉ. अंकिता भगत (यावले)
डॉ. हर्षद भगत
मानसोपचार व समुपदेशन तज्ञ
डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, अमरावती
मो.: 9877539012

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button