मला मंत्रीपदावरून हटविण्याचे प्रयत्न सुरू – आदिवासी विकास मंत्री अशोक उईके

यवतमाळ – आदिवासी विकास विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी एक मोठं आणि धडाकेबाज विधान केलं आहे. ते म्हणाले – “मी आदिवासी विद्यार्थी आणि महिलांसाठी मिशन मोडवर काम करतोय, त्यामुळेच मला मंत्रीपदावरून हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” परंतु मी घाबरणारा नाही, मंत्रीपद गेलं तरी चालेल, पण आदिवासी शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत तडजोड करणार नाही – अशा ठाम शब्दांत उईके यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. आदिवासी आश्रमशाळांतील अपात्र शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, ३० नोव्हेंबरपर्यंत १७९१ शिक्षक सेवेत रुजू होतील, तसेच बाह्य स्त्रोताद्वारे भरती म्हणजे खाजगीकरण नाही, हा केवळ अपप्रचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उईके यांनी स्पष्टपणे सांगितले की – “मी मेलो तरी खाजगीकरण होऊ देणार नाही.”
तसेच पेसा नोकरभरतीचा प्रश्न दोन महिन्यांत सोडवण्याचं आणि अवैध प्रमाणपत्राधारित नियुक्त्यांची चौकशी करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.



