AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठाचे आदर्श विद्यार्थी, उत्कृष्ट कलावंत व उत्कृष्ट एन.सी.सी. कॅडेट पुरस्कार जाहीर

कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले विद्याथ्र्यांचे अभिनंदन

अमरावती – (दि. 26.09.2025) :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास विभागाव्दारे देण्यात येणारे 2025 या वर्षीचे आदर्शी विद्यार्थी, उत्कृष्ट कलावंत आणि उत्कृष्ट एन.सी.सी. कॅडेट पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या मार्गदर्शनात स्थापित निवड समितीने पुरस्कारासाठी परिक्षण केले.

                 आदर्श विद्यार्थी चा पुरस्कार मुलांमधून पी.आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचा वेदांत सुखदेव दुधे याला, तर मुलींमधून श्री शंकरलाल खंडेलवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाची कु. रेणुका जितेंद्र नाळे यांना जाहीर करण्यात आला. उत्कृष्ट कलावंत पुरस्कार मुलांमधून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचा प्रणव वि·ांभर कोरे, मुलींमधून ब्राजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. प्रगती सतिश सुदा हिला, उत्कृष्ट एन.सी.सी. कॅडेट पुरस्कार मुलांमधून ब्राजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचा अनुज दिपक टेंगरे व मुलींमधून जनता कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूरची कु. साक्षी चंद्रकांत वानखेडे यांना जाहीर करण्यात आला आहे.

                 सदर पुरस्काराचे वितरण श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती येथे 7 ऑक्टोबर रोजी होणा-या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारप्राप्त मुला-मुलींचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी अभिनंदन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button