AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागात इंडक्शन कार्यक्रम संपन्न


                  गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर विधी विभागात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्यांसाठी इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.  याप्रसंगी प्रमुख डॉ. व्ही. एस. चौबे, डॉ. के. व्ही. जावळे, प्रा. आर. व्ही. कटकतलवारे, कु. खुशबू झांझोटे प्रामुख्याने उपस्थित होते.

                  कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या वसतिगृह भेटीने झाली. वसतिगृह प्रमुख श्री लोखंडे यांनी विद्याथ्र्यांसाठी उपलब्ध सोयीसुविधांबाबत माहिती दिली. नंतर विद्याथ्र्यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालय विभागाला भेट दिली. केंद्र प्रमुख डॉ. वैशाली गुडधे व श्री. इंगळे यांनी ग्रंथालयातील विविध संसाधनांची माहिती देतांना वाचनपत्रिका, पुस्तके घेणे, नूतनीकरण, वृत्तपत्रे, वाचनगृहे तसेच कायद्याविषयक ग्रंथांची उपलब्धता याबाबत मार्गदर्शन केले. तर श्री. भगत यांनी ग्रंथालयातील सुविधा कशा मिळवायच्या याबाबत माहिती दिली. सौ. गेडाम यांनी ऑनलाइन कायदा जर्नल्स, ई-रिसोर्सेस व पीडीएफ स्वरूपातील पुस्तकांचा वापर कसा करावा, प्लॅजिअरिझम विभागात श्री. सोळंके  यांनी साहित्यिक चोरी तपासणी, शैक्षणिक प्रामाणिकता, विद्यापीठात राबविल्या जाणा-या नियमांविषयी सविस्तर माहिती दिली.

                 कासु विभागातील अधिका-यांनी शिष्यवृत्ती, बोनाफाईड प्रमाणपत्र, क्लिअरन्स फॉर्म, मार्कशीट आदी सेवांची विद्याथ्र्यांना माहिती दिली. संविधान चौकात भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचा शिल्परूप व संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीचे विद्याथ्र्यांनी वाचन केले. सदर कार्यक्रम विभागामुख  डॉ. व्ही. एस. चौबे, डॉ. के. व्ही. जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. श्री मुरलीधर खोपडे यांचे कार्यक्रमाला योगदान लाभले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button