Latest NewsMaharashtra

GATE व JAM परीक्षा सोनेरी भविष्याचे प्रवेशद्वार: आय आय टी द्वारा आयोजित ‘GATE’ व ‘JAM’ या परीक्षेतून संधी’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव संचलित गो.से.महाविद्यालय, खामगाव येथे “स्व. ॲड. भाऊसाहेब बोबडे जयंती उत्सव – २०२५” निमित्ताने “GATE व JAM परीक्षांद्वारे संधी” या विषयावर विद्यार्थी जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल व आय.आय.टी. मुंबईचे GATE ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आय.आय.टी.मुं बईचे संशोधक वैभवकुमार मिश्रा (Ph.D. Aerospace Engineering) आणि तमल हलदर (Ph.D. Energy Science), कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळे व रसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ.हेमंत चांडक हे व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविक पर उद्बोधनात डॉ. चांडक यांनी भारतातील शिक्षण व्यवस्था व IITs  सारख्या अग्रगण्य संस्था मधील शिक्षण पद्धतीवर प्रकाश टाकला.

GATE परीक्षेबद्दल मार्गदर्शन करताना वैभव कुमार मिश्रा म्हणाले की, “या स्वरूपाच्या परीक्षा पास झाल्याच्या नंतर जागतिक स्तरावर संशोधन क्षेत्र व औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी फक्त जिद्द आणि चिकाटीने तयारी करून या परीक्षेत उत्तीर्ण व्हायला हवे.” अशा पद्धतीने मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना GATE व JAM परीक्षेसाठी प्रेरित केले. त्यानंतर तमल हलदर यांनी JAM परीक्षांचे महत्त्व, तयारीची पद्धत, संशोधन व करिअरच्या संधी याबाबत सविस्तर माहिती दिली व विद्यार्थ्यांचा GATE व JAM परीक्षा बदलता उत्साह वाढवला. IITs मधील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळे यांनी विद्यार्थ्यांना GATE व JAM ही परीक्षा देण्यासाठी प्रेरित केले व अश्या प्रकारचे मार्गदर्शनपर कार्यक्रमांची नितांत आवश्यकता असल्याचे विषद केले. या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रा.मनोज बाभळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. जयेश तातेड, प्रा. सूरज ठेंग, प्रा. राज फाटे, प्रा. डी. एस. भुतेकर, प्रा. एम. एस. शिंदे, विनायक शास्त्री, नरेंद्र वाघ यांनी परिश्रम घेतले. यावेळी सभागृहामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button