प्रेयसीवर चाकूने प्राणघातक हल्ला

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नायकुंड ग्रामपंचायत परिसरात २७ वर्षीय संदीप अमरदीप गजभिये हा तरुण आपल्या तीन वर्षांच्या प्रेयसीसोबत राहतो होता. मात्र संदीपच्या दारूच्या व्यसनामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणावरून दोघांमध्ये बोलणे बंद झाले होते. याच कारणावरून काल संदीप संतापला आणि आपल्या प्रेयसीच्या घरासमोर थेट तिच्यावर चाकूने हल्ला केला. आरोपीने मुलीच्या पोटावर प्राणघातक वार केला. मुलीने मदतीसाठी आरडाओरड केली असता संदीप तेथून पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेत गावकऱ्यांनी तिला तात्काळ पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी संदीप गजभिये याला काल रात्री उशिरा अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.



