Latest NewsMaharashtra

कस्टम विभागाची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने जप्त

मुंबई : मुंबईतील कस्टम विभागाने सौदी अरेबियाहून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. सदर व्यक्ती हा सौदी अरेबियाहून आला असल्याची माहिती समोर येत आहे. त्याची झडती घेण्यात आली त्याच्याकडून मेणाच्या स्वरूपात २४ कॅरेट सोन्याची धूळ जप्त करण्यात आली. ज्याचे वजन १.०७ किलो आहे आणि त्याची किंमत १.०२ कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.

कस्टमच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जप्त केलेले सोने हे प्रवाशाच्या शरीरात लपवलेले आढळले. गुप्त माहितीच्या आधारे, मुंबई कस्टमच्या विमानतळ आयुक्तालयाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला थांबवले. हा प्रवासी सौदी अरेबियातील जेद्दाह येथून आला होता. झडती दरम्यान त्यांना सदर व्यक्तीच्या शरीरात लपवलेले सोन्याचे मेण सापडले. त्यानंतर प्रवाशाला सीमाशुल्क कायद्याच्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासेही होऊ शकतात. मुंबई विमानतळावर अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही डीआरआयने गेल्या काही दिवसांपूर्वी कारवाई करताना एका व्यक्तीला अटक केली होती. अटक केलेल्या व्यक्तीकडून कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button