अमरावतीत अवैध डिझेल साठा व गॅस रिफिलिंगवर शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई; मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

एक मोठी बातमी अमरावती शहरातून समोर येत आहे. शहरात अवैधरित्या डिझेलचा साठा आणि गॅस रिफिलिंगचा व्यवसाय करणाऱ्यांवर शहर गुन्हे शाखेने जोरदार कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल, गॅस सिलेंडर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने नागपुरी गेट परिसरात धडक कारवाई करत अवैध धंद्यांना मोठा धक्का दिला आहे. गुलिस्ता नगरमध्ये एका व्यक्तीने अवैधरित्या डिझेलचा साठा केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला.
येथे ४० वर्षीय अब्दुल सलाम अब्दुल सत्तार याच्या घरात १५ डबक्यांमध्ये तब्बल ७९५ लिटर डिझेल साठवून ठेवलेले आढळले. या डिझेलची किंमत अंदाजे ७९ हजार ६४५ रुपये आहे. पोलिसांनी हे डिझेल जप्त करून अब्दुल सलामविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे, याच परिसरात मुझफ्फरपुरा येथे ऑटोमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ४४ वर्षीय अन्वर बेग रहीम बेग याच्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ११ गॅस सिलेंडर, एक इलेक्ट्रिक मशीन, वजन काटा आणि एक ऑटो रिक्षा असा एकूण १ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे शहरात अवैध धंद्यांवर वचक बसण्यास मदत होणार आहे.
तर ही होती अमरावती शहरातून एक मोठी अपडेट. अवैध डिझेल साठा आणि गॅस रिफिलिंगचा व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेली ही कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा city news



