BusinessEducation NewsLatest News

सोन्याने पुन्हा भाव खाल्ला!

Gold Rate Hike Today: सोने १ लाख रुपयांच्या पार; आज खरेदी करायची झाल्यास किती मोजावे लागतील?

पुणे: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू असताना, आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याने पुन्हा एकदा जोरदार भाव खाल्ला आहे. आज सोन्याच्या दरात प्रति तोळा ५० रुपयांची वाढ झाली असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सध्या सोन्याचे दर १ लाख रुपयांच्या पुढे गेल्याने खरेदीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

श्रावण महिना सुरू झाल्याने आणि सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाल्यामुळे अनेक जण सोन्याची खरेदी करतात. सोन्यात केलेली गुंतवणूक नेहमीच चांगला परतावा देते असा समज असला तरी, सध्याच्या वाढलेल्या दरांमुळे सोने खरेदी करावी की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)

२४ कॅरेट सोने: आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा रु. १,०१,४००/- आहेत. या दरात ५० रुपयांची वाढ झाली आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचे दर: रु. ८१,१२०/-
  • १० तोळे सोन्याचे दर: रु. १०,१४,०००/-

२२ कॅरेट सोने: २२ कॅरेट सोन्याच्या दरातही ५० रुपयांची वाढ झाली आहे.

  • १ तोळा सोन्याचे दर: रु. ९२,९५०/-
  • ८ ग्रॅम सोन्याचे दर: रु. ७४,३६०/-
  • १० तोळे सोन्याचे दर: रु. ९,२९,५००/-

१८ कॅरेट सोने: १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ४० रुपयांनी वाढले आहेत.

  • १ तोळा सोन्याचे दर: रु. ७६,०५०/-
  • ८ ग्रॅम सोन्याचे दर: रु. ६०,८४०/- (३२ रुपयांची वाढ)
  • १० तोळे सोन्याचे दर: रु. ७,६०,५००/- (४०० रुपयांची वाढ)

सध्याचे दर पाहता सोने खरेदी करताना योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. दर वाढले असले तरी सणासुदीच्या काळात मागणी वाढतच असते. त्यामुळे पुढील काळात दरांमध्ये आणखी चढ-उतार अपेक्षित आहेत. सोन्यातील गुंतवणुकीबाबत तज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button