खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी परमहंस अडकुजी महाराजांच्या महासमाधीचे घेतलं दर्शन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरु परमहंस सद्गुरू अडकुजी महाराज यांच्या महासमाधीचे वरखेड येथे राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी दर्शन घेतले. वरखेडच्या ज्या खोलीत राष्ट्रसंत ध्यान साधना करत होते त्याच ध्यान साधना खोलीत अनिल बोंडे यांनी काही वेळ ध्यानसाधनाही केली. दरम्यान महाराजांच्या समाधीचे दर्शन व हा संपूर्ण परिसर पाहून कृतकृत्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय नक्कलकार हरिभाऊ मोतीरामजी बेलूरकर यांच्या 89 या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त डॉ.अनिल बोंडे यांनी वरखेडे येथे उपस्थित राहून बेलूरकर दादा यांचे अभिष्टचिंतन केले. या सोहळ्यानंतर त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरु परमहंस श्री सद्गुरु अडकुजी महाराज यांच्या महा समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान आडकोजी महाराजांच्या मंदिरात पूजा- अर्चा देखील केली. यावेळी मंदिर व्यवस्थापन कमिटी तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. माणिक बेलोरकर यांनी त्यांना महासमाधी व मंदिरा संदर्भातील संपूर्ण माहिती दिली. यावेळी किशोर भगत, शरद निंबाळकर, चैतन्य कानिटकर यांच्यासह वरखेड येथील गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ध्यान साधना खोलीत अद्भुत चैतन्य
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परमहंस सद्गुरु अडकुजी महाराज यांचे वरखेड येथे वास्तव्य असताना ज्या खोलीत दोघांकडून ध्यान साधना केली जायची त्या खोलीत अनिल बोंडे यांनी काहीकाळ ध्यान साधना केली. हा संपूर्ण परिसर अलौकिक चैतन्य निर्माण करणार आहे. अतिशय पवित्र असलेल्या या महासमाधीच्या स्थळी भेट व दर्शन घेतल्याने कृतकृत्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.



