AmravatiLatest NewsVidhan Sabha Election 2024

महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनी दिली शाश्वत विकासाची ग्वाही

डिजिटल युगात अद्यावत विकास साधण्यासाठी नियोजित कृती कार्यक्रम राबविणार

महेंद्र कॉलनी -गणेश पेठ भागात जनआशीर्वाद यात्रेतुन स्थानिकांशी संवाद

अमरावती ११ नोव्हेंबर :- 
 आजच्या आधुनिक युगात संगणक व मोबाईल क्रांतीमुळे माहिती, संवाद व शिक्षण अश्या अनेक बाबी आज जनतेला सहज उपलब्ध झाल्या आहे.  ऑनलाईन पद्धतीचा जीवनात प्रत्यक्ष वापर होत असल्याने प्रत्येकाने डिजिटलाझेशनची कास धरली आहे. नव्या डिजिटल युगात नव्या प्रगत संधी उपलब्ध होण्यासाठी व अत्याधुनिक तंत्रज्ञानातून विकासाला चालना देण्याकरिता एक नियोजित कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.  आगामी काळात याला मूर्त रूप मिळण्यासाठी सर्वांची साथ मोलाची आहे. जनतेच्या जीवनात डिजिटल क्रांतीतून विकासाला आकार देत त्यांच्या जीवनात नवा बदल घडविण्यासाठी आपण प्रयत्नरत असल्याची ग्वाही महायुतीच्या उमेदवार सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी दिली. आगामी २० नोव्हेंबर २०२४ रोजी होऊ घातलेल्या अमरावती  विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना , रिपाई  (आठवले गट ) , पीरिपा व मित्र पक्ष, महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.सुलभाताई संजय खोडके यांच्या प्रचारार्थ  प्रभागा -प्रभागात सुरु असलेल्या जनआशीर्वाद यात्रेने चांगलाच जोर धरला आहे. सर्वसमावेशक जनतेच्या वाढत्या अभूतपूर्व प्रतिसादात सुलभाताईंनी  महेंद्र कॉलनी प्रभागातील गणेश पेठ,प्रवीण नगर, नरेडी नगर , अमर नगर , छत्रसाल नगर आदी भागातील नागरिकनांशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांनी मतदारांशी संवाद साधून आगामी निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले. मागील काळात आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी स्थानिक भागात विकासाची गंगाचं खेचून आणल्याने परिसराला नवी चकाकी आली आहे. पायाभूत सुविधांच्या पूर्ततेतून जनतेचे जीवनमान उंचावले असल्याने यातून आर्थिक , सामाजिक , सांस्कृतिक , शैक्षणिक व क्रीडा अश्या सर्वांगीण विकासाला बळकटी व गती मिळाली आहे. त्यामुळे अमरावतीच्या विकासासाठी सुलभाताई सक्षम उमेदवार असल्याचा एकसुर यावेळी स्थानिक नागरिकांमध्ये उमटला होता. दरम्यान महिलांनी सुलभाताईंचे औक्षण करून सत्कार केला. यावेळी जेष्ठ नागरिकांची सुद्धा भरपूर साथ लाभली.      जनतेनी वेळोवेळी केलेले सहकार्य,दिलेली अखंडितपणे साथ,आपुलकी-जिव्हाळा ही सकारात्मक आणि सर्जनशील शक्ती आपणाला क्षणोक्षणी प्रेरणादायी व उर्जादायी ठरली आहे.  सर्वांच्या जीवनात नवा विकास व बदल घडविण्यासाठी  आपण सातत्याने प्रयत्नरत राहू.  नागरिकांना सुलभ,सुरक्षित आणि विस्तारित सुविधा मिळाल्या पाहिजे.याला आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा इंजिनिअरिंग आणि क्लाउड टेक्नॉलॉजीमधील कौशल्याची मागणी लक्षात घेता आयटी आणि सेवा क्षेत्रात स्थानिक युवक-युवतींना संधी उपलब्ध व्हावी याकरिता आपण विधिमंडळात सभागृहात मागणीही केली असून अमरावती येथे वर्क फ्रॉम टाऊन सुरु करण्याचे व्हिजन आहे. विकसनशील अमरावती शहराला विकसित बनविण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून उद्दिष्टानुकूल निर्णय आणि धोरणांची परंपरा कायम ठेवीत पायाभूत सुविधांचा गतीमानतेन विकास करण्यावर आपला सातत्यपूर्ण भर आहे.  अमरावतीच्या  दीर्घकालीन विकासाला गती व दिशा देणाऱ्या या निवडणुकीत मतदानरुपी आशीर्वाद प्रदान करण्याचे आवाहक महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांची केले.  यावेळी संपूर्ण परिसर घड्याळमय झाल्याने सर्वत्र महायुतीचा बोलबाला दिसून आला.  या पदयात्रेमधे महेंद्र कॉलनी प्रभागातील गणेश पेठ,प्रवीण नगर, नरेडी नगर , अमर नगर , छत्रसाल नगर आदी भागातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button