शक्तीपिठाधीश्वर शक्ती महाराज प्रयागराज कुंभमेळ्यात दाखल, हिंदू राष्ट्र घोषित करण्याचा दिला नारा

अमरावतीचे शक्तीपिठाधीश्वर शक्ती महाराज यांनी प्रयागराज कुंभमेळ्यात भाग घेतला आहे. त्यांनी अनेक साधू संतांची भेट घेतली, तसेच पवित्र नदीचे पूजन करीत भारत देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची प्रार्थना केली आहे. त्याचबरोबर, बांगलादेशी नागरिकांच्या हद्दपारीची मागणीही कुंभमेळ्यातून केली आहे.
प्रयागराज कुंभमेळ्यात शक्ती महाराज यांनी स्नान केले आणि पवित्र गंगाजलाचे पूजन केले. यावेळी त्यांनी भारत देशाच्या हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होण्याच्या प्रार्थनेसाठी व्रत घेतले. येशिवाय, बांगलादेशी नागरिकांच्या हद्दपारीचा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला. शक्ती महाराजांनी यज्ञचार्य दुबेजी सोबत संवाद साधला आणि आपली धार्मिक आणि राष्ट्रीय ध्येये स्पष्ट केली. यावेळी, महिलांनी कालीमाता मंदिरातील दर्शन घेतले आणि भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याचा ठाम नारा दिला.
प्रयागराजच्या कुंभमेळ्यात अमरावतीचे महाकाली शक्तीपीठ प्रतिष्ठानचे पीठाधीश शक्ती महाराज यांचे कार्य आणि विचार चर्चेचा विषय बनले आहेत. अशा महत्वपूर्ण घटनांची पुढील माहिती आपल्याला देत राहू. पाहत राहा, सिटी न्यूज.



