पांगरीतील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांगरी गावातील शेतकऱ्यांना गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. टोमॅटोच्या उभ्या पिकांवर पांढरे डाग पडल्यामुळे शेतकऱ्यांना आपला खर्च उचलता येत नाही आणि त्यांच्यावर मोठे नुकसान ओढवले आहे.
नांदेड जिल्ह्यातील पांगरी गावातील शेतकऱ्यांना या हंगामात टोमॅटोच्या उभ्या पिकांवर पांढरे डाग पडल्याने मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे. टोमॅटो बाजारात दोन रुपयांना प्रति किलो विकले जात आहेत, जे शेतकऱ्यांच्या लागवडीच्या खर्चाला पूर्णपणे मिळत नाही. शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघत नसल्याने टोमॅटोवर रोटाव्हेटर फिरवल्याने शेतात लाल चिखल होत आहे.या गावातील साठ ते सत्तर शेतकऱ्यांचा सुमारे तीस ते चाळीस लाखांचा लागवडी खर्च व सुमारे दीड ते दोन कोटींच्यावर उत्पन्नावर पाणी फेरले आहे.या आर्थिक फटाक्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.



