AmravatiLatest NewsLocal News

रक्तदानाचा महायज्ञ: अमरावती जिल्ह्यात समाजसेवेचा नवा अध्याय

रक्तदान हेच श्रेष्ठदान, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा याला केंद्रबिंदू मानत रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदान देण्याकरिता भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी या नवीन वर्षामध्ये सतत 365 दिवस दररोज रक्तदान मोहीम राबवण्याचा संकल्प केलेला आहे. या माध्यमातून वर्षभर रोज किमान 25 बॉटल रक्तदान केल्या जाईल. सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढीमध्ये हा रक्तसाठा जमा केल्या जाईल. या संकल्पामुळे वर्षभर रक्ताचा तुटवडा भासणार नाही. वर्षभर रक्त उपलब्ध होऊन सामान्य रुग्णालयामधल्या गोरगरीब रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी मदत होणार असल्याची अपेक्षा देखील अनिल बोंडे यांनी केली आहे. आज १ जानेवारी डॉ अनिल बोडे यांची मुलगी मनाली यांच्या वाढदिवसाच्या निमित्य रक्तदान शिबिराला शुभरंभ करण्यात आला

अमरावती जिल्ह्याला रक्तदानाचे खास वरदान लाभलेले आहे. सातत्याने रक्तदान चळवळीमध्ये सर्व नागरिक सहभागी होत असतात. परंतु तरीसुद्धा अनेक दिवशी विशेषता उन्हाळ्यामध्ये सणावाराच्या दिवशी रक्ताची गरज जास्त भासते. त्यावेळेला रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होतो. विविध आजारामध्ये ज्याप्रमाणे डेंग्यू, मलेरियामध्ये प्लेटलेट कमी झाल्या तर रक्ताची गरज भासते. वाढते अपघात, शस्त्रक्रिया त्याचप्रमाणे प्रसूतीच्या दरम्यान महिलांना लागणारे रक्त या सगळ्या गोष्टीची पूर्तता करताना सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथील रक्तपेढीला प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागते. अमरावती जिल्ह्यामध्ये रक्तदान मोठ्या प्रमाणात होते. परंतु रोज रक्तदान होत नसल्यामुळे रोजची गरज किमान 40 ते 45 पिशव्यांची आहे. त्यामुळे अतिशय वेळाने रक्त रुग्णालयाला प्राप्त होते. या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याकरता रोज रक्तदानाच्या माध्यमातून 25 ते 30 पिशव्या जर रक्तदान झालं तर रक्त देण्याचे नियोजन या रुग्णालयामध्ये उत्कृष्टरित्या करता येणार आहे. ही बाब लक्षात घेता भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी संपूर्ण वर्षभर कार्यकर्ते तसेच जनतेच्या माध्यमातून रोज 365 दिवस रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे ठरविले. त्यासाठी ज्यांचा वाढदिवस येतो त्यांच्याकडे रक्तदान शिबिर आयोजित केल्या जाईल. त्यासोबतच रक्तदान शिबिर आयोजित करणारे आणि रक्तदात्यांचा सत्कार डॉ.अनिल बोंडे आणि त्यांचे सहकारी रोज करणार आहेत. 365 दिवस सतत रक्तदान महायज्ञाची सुरुवात 1 जानेवारीपासून डॉ.अनिल बोंडे यांची कन्या मनाली बोंडे यांच्या वाढदिवसा पासून करण्यात आली आहे . बोंडे हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या जागेवर हे रक्तदान आयोजित करण्यात आलेले आहे. या दिवसापासून या मोहिमेची सुरुवात करून शहरांमध्ये व जिल्ह्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी नागरिकांनी समोर यावे असे आवाहन देखील डॉ.अनिल बोंडे यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button