citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात नायलॉन मांजाची तस्करी उघड; २६ चक्रींसह एकाला अटक

गांधीबाग गार्डन परिसरात तहसील पोलिसांचा सापळा; छुप्या पद्धतीने विक्री करण्याचा प्रयत्न उधळला

नागपूर : शहरात प्रतिबंधित आणि जीवघेण्या नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री करण्याचा प्रयत्न तहसील पोलिसांनी उधळून लावला आहे. गांधीबाग गार्डन परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. वसीम अकरम मोहम्मद अहमद (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांचा सापळा

गांधीबाग गार्डनजवळ एक व्यक्ती प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती तहसील पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित वसीमला ताब्यात घेऊन त्याची झडती घेण्यात आली.

प्लास्टिकच्या गोणीत लपवलेला मांजा जप्त

झडतीदरम्यान आरोपीकडे असलेल्या प्लास्टिकच्या गोणीत लपवून ठेवलेले प्रतिबंधित नायलॉन मांजाचे २६ गट्टे (चक्री) आढळून आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मांजा पुरवठादाराचा शोध सुरू

आरोपीने हा नायलॉन मांजा कोणाकडून खरेदी केला होता आणि शहरात प्रतिबंधित मांजाच्या विक्रीसाठी आणखी कोणते नेटवर्क सक्रिय आहे, याचा तपास तहसील पोलीस करीत आहेत.

नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार, पक्षी आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रतिबंधित मांजाची विक्री किंवा वापर आढळल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

टिकर : गांधीबाग गार्डनजवळ तहसील पोलिसांची धडक कारवाई; २६ चक्री नायलॉन मांजासह एकाला अटक

बाईट : संजय मेंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तहसील पोलीस ठाणे

सिटी न्यूज | नागपूर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button