Amravati GramincitynewsDharniMaharashtra

धारणी तालुक्यात डीजेमुक्त दुर्गोत्सव; २०० मंडळांचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांच्याकडून अभिनंदन

न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत दुर्गोत्सव शांततेत संपन्न; सामाजिक सलोखा राखल्याबद्दल पोलीस प्रशासनाकडून मंडळांचे कौतुक

धारणी : धारणी तालुक्यात यंदाचा दुर्गोत्सव न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत शांततेत पार पडला. डीजेवरील निर्बंधांचे पालन करून दुर्गा मंडळांनी विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडल्या. याबद्दल धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांनी तालुक्यातील सुमारे २०० दुर्गोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

यंदाच्या दुर्गोत्सवात न्यायालयाच्या निर्देशांनुसार डीजेच्या वापरावर निर्बंध असल्याने धारणी तालुक्यातील दुर्गोत्सव मंडळांनी डीजेचा वापर टाळला. मंडळांनी नियमांचे पालन करत धार्मिक उत्सव आणि विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडल्या. त्यामुळे उत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत झाली.

अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि धारणी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. न्यायालयाच्या निर्देशांचा आदर राखत उत्सव साजरा केल्याबद्दल ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांनी सर्व मंडळांचे विशेष कौतुक केले.

धारणी तालुक्यातील नागरिक आणि दुर्गोत्सव मंडळांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे. भविष्यातही सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रम शांततेत, नियमांचे पालन करून आणि सामाजिक सलोखा जपत साजरे करावेत, अशी अपेक्षा ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांनी व्यक्त केली. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या धारणीतील नागरिकांचे आणि सर्व मंडळांचे त्यांनी आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button