amravaticitynews

अमरावतीत तिरुपती बालाजीचा भव्य देखावा

सार्वजनिक बलवंत गणेशोत्सव मंडळाचा ७६ वा गणेशोत्सव; विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह केरळच्या सांस्कृतिक झाकीचे आकर्षण

अमरावती : अमरावतीच्या गणेशोत्सवाला यंदा भक्ती आणि भव्यतेची अनोखी जोड मिळाली आहे. सार्वजनिक बलवंत गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा तिरुपती बालाजी संस्थानचा भव्य देखावा साकारण्यात आला असून, हा देखावा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मंडळाच्या ७६ व्या वर्षानिमित्त साकारण्यात आलेल्या या देखाव्याला भेट देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

तिरुपती बालाजीच्या भक्तिमय वातावरणाची अनुभूती देणाऱ्या या देखाव्यात मंदिराची प्रतिकृती आणि धार्मिक वातावरण साकारण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तिरुपती बालाजीच्या भक्तीपरंपरेची झलक अमरावतीकरांना अनुभवता येत आहे.

दरम्यान, येत्या २६ सप्टेंबर रोजी गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत तिरुपती बालाजी संस्थानची पारंपरिक वाद्ये अमरावतीकरांना प्रत्यक्ष पाहता आणि अनुभवता येणार आहेत. यासोबतच केरळ राज्यातील पारंपरिक नृत्य आणि विशेष झाकीही सादर करण्यात येणार आहे.

मंडळाचे सचिव गजानन पांडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांकडून गणेशोत्सवाच्या आयोजनाची तयारी करण्यात आली आहे. धार्मिक श्रद्धेसोबतच देशातील विविध प्रांतांच्या सांस्कृतिक परंपरांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न यंदाच्या उत्सवातून करण्यात आला आहे.

भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वैविध्याचा संगम असलेला तिरुपती बालाजीचा हा भव्य देखावा अमरावतीकरांसाठी यंदाच्या गणेशोत्सवातील विशेष आकर्षण ठरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button