BreakingNewscitynewsCrime NewsNagpurNagpurCrime

नागपुरात वाहन चोरट्यांविरोधात गुन्हे शाखेची मोठी कारवाई

तीन पोलीस ठाण्यांतील वाहन चोरीचे गुन्हे उघड; २ लाख ४० हजारांच्या तीन स्कूटर जप्त

नागपुरात वाहन चोरट्यांविरोधात गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक ६ने तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमधील वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणत तब्बल २ लाख ४० हजार रुपयांच्या तीन स्कूटर जप्त केल्या आहेत.

जुनी कामठी, राणाप्रताप नगर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेल्या तीन ॲक्सेस स्कूटर या कारवाईत हस्तगत करण्यात आल्या. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत १९ वर्षीय आशुतोष रतिराम यादव याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आशुतोष यादव याने तीन वाहन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या तीन स्कूटर जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत २ लाख ४० हजार रुपये आहे.

या प्रकरणातील बलराम दुबे हा आणखी एक आरोपी पाहिजे असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे.

गुन्हे शाखा युनिट क्रमांक ६च्या या कारवाईमुळे वाहन चोरीचे तब्बल तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त वाहनांबाबत पुढील तपास सुरू असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button