Accident NewsBreakingNewscitynewsMaharashtraNagpurNagpurPolice

निको हेवी इंजिनिअरिंग कारखान्यात भीषण अपघात; कामगाराचा मृत्यू

कन्वेयर बेल्टमध्ये हात अडकल्याने ३० वर्षीय रोहित चौबेचा दुर्दैवी अंत; कामगारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

निको हेवी इंजिनिअरिंग कास्टिंग लिमिटेड कारखान्यात कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळू आणि माती वर नेणाऱ्या क्रेनच्या कन्वेयर बेल्टमध्ये हात अडकल्याने ३० वर्षीय कामगाराचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कारखाना परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

१४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रोहित रामदुलार चौबे हा नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. लोह वितळवणाऱ्या भट्टीजवळ उंचीवर असलेल्या क्रेनवर तो काम करत असताना अचानक त्याचा हात कन्वेयर बेल्टमध्ये अडकला. या दुर्घटनेत रोहित गंभीर जखमी झाला.

घटना लक्षात येताच सहकाऱ्यांनी तात्काळ क्रेन बंद करून रोहितला खाली उतरवले आणि उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित यापूर्वी प्लंबर सहाय्यक म्हणून काम करत होता. विशेष म्हणजे, घटनेच्या दिवशी प्रथमच त्याला उंचीवर असलेले धोकादायक काम देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रोहितच्या पश्चात पत्नी आणि अवघ्या चार महिन्यांचे बाळ आहे.

एका कुटुंबाचा आधार असलेल्या तरुण कामगाराचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजना, प्रशिक्षण आणि धोकादायक कामाची जबाबदारी याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता या प्रकरणात नेमकी जबाबदारी निश्चित होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button