Buldhanacitynews

स्मशानभूमीच्या जुन्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी

दगड, विटा आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला; महिलांसह पाच जण गंभीर जखमी, ४० हून अधिक जणांवर गुन्हे

संग्रामपूर : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील शेवगा खुर्द येथे स्मशानभूमीच्या जागेवरून सुरू असलेल्या जुन्या वादाला पोळ्याच्या दिवशी पुन्हा तोंड फुटले. यावेळी दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी दगड, विटा आणि लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आल्याची माहिती असून, या घटनेत महिलांसह अनेक जण जखमी झाले आहेत.

या हाणामारीत गणेश पिवतकार, मधुकर पिवतकार, भुरा सोनोने, प्रदुम्न सोनोने आणि गणेश सोनोने हे पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना सुरुवातीला शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पाचही जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे.

घटनेनंतर तामगाव पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील ४० हून अधिक जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एका गटाविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

स्मशानभूमीच्या जागेवरून सुरू असलेल्या जुन्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याने शेवगा खुर्द गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button