AMCActionAmravatiAmravatiCorporationcitynews

अमरावतीच्या महत्त्वाच्या पुलासाठी 130 कोटींची तरतूद! ऑक्टोबरपासून कामाला सुरुवात; अडचणी होणार दूर

अमरावतीतील महत्त्वाच्या पुलाच्या कामाला आता मोठी गती मिळणार आहे. या पुलाचा प्रश्न विधान परिषद आणि विधानसभेत मांडण्यात आल्यानंतर पुलाचे काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पुलासाठी सरकारकडून सुमारे 130 कोटी रुपयांची बजेटमध्ये तरतूद मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी हे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणार होते. मात्र, राज्यातील रेल्वे पूल MAHARELच्या माध्यमातून करण्याचा निर्णय झाल्यानंतर हे काम आता महारेलकडे सोपवण्यात आले आहे.

ऑक्टोबरदरम्यान पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता आहे. रेल्वे ट्रॅकचा भविष्यातील विस्तार आणि इतर तांत्रिक बाबी लक्षात घेऊन पुलाचे डिझाईन करण्यात आले आहे. तसेच अप्रोच रोडसह आवश्यक त्या सर्व तरतुदी करण्यात आल्याने तांत्रिक अडचणी येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर अमरावतीतील नागरिकांना सध्या जाणवत असलेल्या वाहतूक आणि दळणवळणाच्या अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होण्याची अपेक्षा आहे.

130 कोटींचा निधी | ऑक्टोबरपासून काम | महारेलकडे जबाबदारी | नागरिकांना मोठा दिलासा

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button