amravatiBreakingNewscitynews

राजकमल चौकात बँक कर्मचारी-अधिकाऱ्यांचा जोरदार एल्गार

५ दिवसांचे बँकिंग’ तात्काळ लागू करा; कराराचा सन्मान आणि PLI मधील भेदभाव थांबवण्याची मागणी

अमरावती : राजकमल चौकात बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केले. ‘५ दिवसांचे बँकिंग तात्काळ लागू करा, कराराचा सन्मान करा आणि PLI योजनेतील भेदभाव थांबवा’, या प्रमुख मागण्यांसाठी United Forum of Bank Unions अर्थात UFBUच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे सरकार आणि बँक व्यवस्थापनाचे लक्ष वेधले.

‘५ दिवसांचे बँकिंग’ तात्काळ लागू करण्याची मागणी

८ मार्च २०२४ रोजी झालेल्या Settlement आणि Joint Note मध्ये मान्य करण्यात आलेले ५ दिवसांचे बँकिंग तात्काळ लागू करावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांत दररोज अतिरिक्त ४० मिनिटे काम करण्यास युनियनने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे ग्राहक सेवेत कोणतीही कपात होणार नसल्याचा दावा UFBUकडून करण्यात आला.

बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आठवड्यात दोन दिवसांची साप्ताहिक सुटी देण्याचा निर्णय करारात मान्य करण्यात आला असतानाही त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे मान्य केलेल्या कराराची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.

PLI योजनेतील भेदभावाचा आरोप

यासोबतच Performance Linked Incentive अर्थात PLI योजनेतील कथित भेदभावाविरोधातही बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आवाज उठवला. PLI योजनेत ९५ टक्के कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून, केवळ ५ टक्के अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात Incentive देण्याची व्यवस्था अन्यायकारक असल्याचा आरोप UFBUने केला आहे.

कराराचा सन्मान करा, ५ दिवसांचे बँकिंग लागू करा आणि प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा, अशी मागणी करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

बेमुदत बँक संपाचा इशारा

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा अधिक तीव्र करण्याची भूमिका UFBUने घेतली आहे. ११ सप्टेंबर तसेच २८, २९ आणि ३० सप्टेंबरच्या आंदोलनानंतरही मागण्यांची दखल न घेतल्यास २६ ऑक्टोबर २०२६ पासून बेमुदत देशव्यापी बँक संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनामुळे आगामी काळात बँकिंग सेवा आणि ग्राहक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि बँक व्यवस्थापन या मागण्यांवर काय भूमिका घेतात, तसेच प्रस्तावित बेमुदत संप टाळण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे बँक कर्मचारी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button