AmravatiEducation NewsLatest News

गोपालनगर स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी रेणुका भोजने, मयुरी गादरे, प्रफुल्ल रंगारी, सपना गोडबोले नेत्रदीपक यश प्राप्त केले

अमरावती :- अमरावती महानगर पालिका संचालित स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व केंद्र नृसिंह सरस्वती नगर गोपाल नगर अमरावती शहरातील विधार्थी करीता दीपस्तंभ ‌ठरत आहे. या अभ्यासिकेमुळे रेणुका भोजने लघुटंकलेखन व कनिष्ठ लिपिक जिल्हा न्यायालय ठाणे, मयुरी गादरे यांची जिल्हा सत्र न्यायालय अमरावती, प्रफुल्ल रंगारी यांची लघुटंकलेखन यवतमाळ, सपना गोडबोले यांची लघुटंकलेखन मुंबई महानगरपालिका या पदावर नियुक्त झालेली आहे.

यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेमध्ये माजी सभागृह नेता सुनील भाऊ काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा व त्यांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला, या विद्यार्थ्यांच्या यशामुळे या केंद्रावरील अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व अधिकाधिक यश मिळेल , अशी शुभकामना व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अभ्यासिका बाबत कृतज्ञता व्यक्त केली तसेच यावेळी प्रामुख्याने केंद्र प्रमुख श्रीधर हिवराळे, विशाल इंगोले , गायत्री ठाकरे, अब्दुल रशीद व विद्यार्थांचे पालक अनुसया भोजने आणि संगीता गांदरे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

गोपालनगर अभ्यासिकेचे वैशिष्ट्य असे माजी सभागृहनेता सुनिलभाऊ काळे आणि महानगरपालिका उपायुक्त सामान्य नरेंद्र वानखेडे व महिला व बालविकास अधिकारी तथा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांच्या पुढाकारने गेल्या काही वर्षापुर्वी स्पर्धा परीक्षा गोपालनगर अभ्यासिका/ग्रंथालय केंद्र निर्मिती केले असुन हा राज्यतील नाविन्यपुर्ण उपक्रम ठरला आहे. शेकडो विद्यार्थी या केंद्राचा लाभ घेऊन शासकीय सेवेत विविध पदांवर रूजु झालेले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button