citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची जप्ती; पानटपरी चालकाविरोधात गुन्हा

पोलिस आयुक्तांच्या पथकाची कारवाई; सुमारे १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, सीताबर्डी पोलिसांत गुन्हा दाखल

नागपूर : नागपूर रेल्वे स्टेशन परिसरातील एका पानटपरीवर पोलिस आयुक्तांच्या पथकाने छापा टाकत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर साहित्य असा सुमारे १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईनंतर संबंधित पानटपरी चालकाविरोधात सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या वेळी पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या एस्कॉर्ट पथकाचे प्रमुख API भगवान कोळी यांच्या पथकाने नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करत असताना एका पानटपरीची तपासणी केली.

यावेळी पानटपरीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले विविध तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १९ हजार रुपये असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी आरोपी आयुब सलीम मिर्झीयावाले, वय ३५ वर्षे, रा. राजाबाजार, गोंड मोहल्ला, नागपूर याच्याविरोधात सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांसोबतच इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे नागपूर रेल्वे स्टेशनसारख्या वर्दळीच्या परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एस्कॉर्ट पथकाचे प्रमुख API भगवान कोळी, पोलीस निरीक्षक भगवान कोळी, पोलीस नाईक अनूप लोहरे, आशिष गायकवाड, अरविंद शेख, मनोज भिमकर, दिनेश क्षीरसागर, चंद्रकांत मेहेत्रे आणि महिला पोलीस स्वाती पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, नागपूर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button