AkolacitynewsLatest NewsMaharashtra

अकोल्यात ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सज्ज

कायदा-सुव्यवस्था, जुलूस आणि वाहतूक नियोजनावर विशेष बैठक; शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन

ईद ए मिलादचा सण शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत साजरा व्हावा, यासाठी अकोला पोलिस प्रशासन सज्ज झालं आहे. आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, धर्मगुरू आणि मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्तींची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कायदा आणि सुव्यवस्था, जुलूस व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि पोलीस बंदोबस्तासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

अकोल्यात आगामी ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात येत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार, 21 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता पोलीस लॉन, अकोला येथे पोलीस प्रशासन, धर्मगुरू आणि मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्तींची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.

ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

तसंच सणाच्या काळात निघणाऱ्या जुलूसाची व्यवस्था, वाहतूक नियोजन, पोलीस बंदोबस्त आणि नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ईद ए मिलादचा उत्सव शांततेत आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत पार पडावा, यासाठी धर्मगुरू आणि मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्तींनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

यासोबतच पत्रकार आणि प्रसारमाध्यमांनीही शांतता, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जुलूस आणि वाहतुकीचे नियोजन सुरळीत राहावं आणि अकोल्यातील शांततेची परंपरा कायम राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

पोलिस प्रशासनाच्या या नियोजनामुळे ईद ए मिलादचा सण शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं स्पष्ट होत आहे.

ईद ए मिलादचा सण शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात पार पडावा, यासाठी अकोला पोलिस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच जुलूस आणि वाहतूक व्यवस्थेचंही नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत ईद ए मिलादचा सण उत्साहात, शांततेत आणि सामाजिक एकतेचा संदेश देत साजरा करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button