AmravaticitynewsLatest NewsMaharashtraMorshi

प्रा. डॉ. मोनिका आशीष उमक यांची विदर्भ महिला अध्यक्षपदी नियुक्ती

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा निर्णय; प्रा. विजय ढोले यांची विदर्भ कार्याध्यक्षपदी निवड

अमरावती | प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आणि अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रा. डॉ. मोनिका आशीष उमक यांची विदर्भ महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे तैलिक समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या कार्यक्रमाला माजी खासदार नवनीत राणा, मोर्शीच्या माजी नगराध्यक्षा प्रतिक्षा गुल्हाने आणि आर्वीच्या माजी नगराध्यक्षा स्वाती गुल्हाने यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्राचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहमतीने, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे राज्याध्यक्ष रामदास तडस, महासचिव राजेश हजारे आणि विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.

प्रा. डॉ. मोनिका उमक या गेल्या अनेक वर्षांपासून ‘स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान’ या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योजकता विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवून अनेक महिलांना स्वावलंबी बनविण्याचे काम केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास यश मिळविले आहे.

महिला सक्षमीकरण, समाजहित, संघटन बळकटी आणि सामाजिक एकात्मता वाढविण्यासाठी त्या अधिक जोमाने कार्य करतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वामुळे समाजाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, याच कार्यक्रमात प्रा. विजय रावजी ढोले यांची विदर्भ कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवाचा समाजकार्यासाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करत समाजबांधवांनी त्यांचेही अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे, शहर युवा अध्यक्ष अतुल मांडवे, विभाग युवा अध्यक्ष सागर शिरभाते, जिल्हाध्यक्ष दीपक गिरुळकर, शहराध्यक्ष चंद्रशेखर जावरे, राज्य सचिव अमोल अगाशे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

नियुक्तीनंतर अमरावतीसह विदर्भातील विविध ठिकाणी प्रा. डॉ. मोनिका उमक आणि प्रा. विजय ढोले यांचा सत्कार करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी समाजबांधवांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button