City CrimecitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtra PoliticsMaharashtraNewsNagpurNagpurCrimeNagpurCrimeNewsNagpurPolice

नागपुरात घरफोडीचा पर्दाफाश! गुन्हे शाखेच्या जाळ्यात आरोपी; 82 हजारांचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर लगाम घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट-3 पथकाने पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत पोलिसांनी एका आरोपीसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 118/26 आणि 122/26 या घरफोडीच्या प्रकरणांचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या युनिट-3 पथकाने निकेश रितेश लिंगायत (वय 19 वर्षे), रा. बाबा बुद्ध नगर, गल्ली क्रमांक 3, पाचपावली, नागपूर याला ताब्यात घेतले. याचबरोबर एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान दोघांनीही संबंधित घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा केला. कारवाईदरम्यान आरोपींकडून 5.300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ज्याची अंदाजे किंमत 70 हजार रुपये आहे, तसेच तीन संगणक मॉनिटर्स किंमत 12 हजार रुपये असा एकूण 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणातील सलमान नावाचा आणखी एक आरोपी सध्या फरार असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

ताब्यात घेतलेल्या आरोपी आणि विधी संघर्षग्रस्त बालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून जप्त मुद्देमालासह त्यांना पुढील तपासासाठी शांतीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नागपूर शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी गुन्हे शाखेचे युनिट-3 सातत्याने सक्रिय असून, या कारवाईमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या दक्षतेची आणि तत्परतेची प्रचिती आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button