BuldhanacitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

मेहकरमध्ये दरोडा टाकत पोलिसांवर हल्ला करणारे आरोपी १२ तासांत जेरबंद; शहरातून काढली धिंड

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातून एक मोठी आणि थरारक बातमी समोर आली आहे. लक्ष्मीनारायण नगर भागात दरोडा टाकत पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना मेहकर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले आहे. इतकेच नाही तर आरोपींची शहरातून धिंड काढत पोलिसांनी गुन्हेगारांना थेट इशारा दिला आहे.

२२ मे २०२६ रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास मेहकर शहरातील लक्ष्मीनारायण नगर परिसरात ही धाडसी दरोड्याची घटना घडली. काही चोरटे एका अपार्टमेंटमध्ये शिरल्याची माहिती रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली होती.

माहिती मिळताच पोलीस अंमलदार आणि चालक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी पोलिसांवरच जीवघेणा हल्ला चढवला आणि त्यांना जखमी केले.

या झटापटीदरम्यान आरोपींनी घटनास्थळावरून सुमारे तीन तोळे चांदीचे दागिने आणि ड्रीम युगा मोटारसायकल असा मुद्देमाल चोरून नेला होता. घटनेनंतर संपूर्ण मेहकर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत विविध पथके रवाना केली. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढत बीबी आणि देऊळगाव राजा परिसरातून तिघांनाही शिताफीने ताब्यात घेतले.

या प्रकरणातील आरोपी धर्मेंद्र सिंग बावरी, अजित सिंग टाक आणि देशपाल सिंग भादावय अशी ओळख पटली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील दुचाकी आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले टामी जप्त केले आहे.

दरम्यान आरोपींना अटक केल्यानंतर मेहकर शहरातील मुख्य रस्त्यांवरून त्यांची धिंड काढण्यात आली. या कारवाईमुळे शहरात कायद्याचा धाक निर्माण झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत केले आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संपूर्ण कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

मेहकर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. पुढील तपास सध्या सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button