Crime NewsLatest NewsNagpur

नागपुरात धक्कादायक प्रकरण: अल्पवयीन मुलीसोबत राहणारा आरोपी अटकेत, नंदनवन पोलिसांची कारवाई

नागपुरातून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीसोबत राहणाऱ्या तरुणावर गंभीर आरोप करण्यात आले असून नंदनवन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गर्भधारणेनंतर मेडिकल तपासणीत हे प्रकरण उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

नागपुरात अल्पवयीन मुलीशी कथित विवाह करून तिच्यासोबत राहणाऱ्या आरोपीविरुद्ध नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अक्षय याने सतरावर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले होते. यानंतर दोघे नंदनवन परिसरात एकत्र राहत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पीडित मुलगी गर्भवती झाल्यानंतर आरोपी तिला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेला. मात्र तपासणीदरम्यान आधार कार्डवरील माहितीतून संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आले. यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे नंदनवन पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपी अक्षय याला ताब्यात घेतले. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून संपूर्ण घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

अल्पवयीन मुलांशी संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया अत्यंत कठोर असते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button