Crime NewsLatest NewsNagpur

ऑपरेशन थंडरमध्ये मोठी कारवाई, ओमकार नगरातून 85 किलो प्रतिबंधित तंबाखू जप्त, आरोपी अटकेत

नागपुरात प्रतिबंधित तंबाखू विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत ऑपरेशन थंडर अंतर्गत धडक मोहीम राबवली आहे. अजनी पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाच्या संयुक्त कारवाईत ओमकार नगर परिसरातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाला जप्त करण्यात आला आहे.

ऑपरेशन थंडर अंतर्गत अजनी पोलीस आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ओमकार नगर भागात मोठी कारवाई केली. द केक झोन दुकानासमोर दुचाकीवरून प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर सापळा रचत पोलिसांनी प्रमोद रामेश्वर तितरे याला रंगेहात ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीच्या ताब्यातून आणि घरावर टाकलेल्या धाडीत विमल राजश्री आणि केपी या नामांकित ब्रँडचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण पंच्याऐंशी किलो सातशे तीन ग्रॅम प्रतिबंधित तंबाखू आणि पानमसाला जप्त करण्यात आला. यासोबतच दुचाकीसह एकूण दोन लाख एक हजार सातशे ब्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अजनी पोलीस करत आहेत. प्रतिबंधित तंबाखूविरोधातील ही कारवाई शहरात सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेतील महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. प्रतिबंधित तंबाखू विक्रीविरोधात प्रशासन अधिक आक्रमक झाल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button