Uncategorized

“शनी अमावस्येच्या रात्री भोंदू बाबाचा खूनी खेळ; धुळ्यात दुहेरी हत्याकांड”


धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एका भोंदू बाबाने केलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे. विवाहित महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न फसल्याने तिचा खून करण्यात आला, तर पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या मित्रालाही संपवण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वर्धाने शिवारात जयश्री काकुस्ते या विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय होता. मात्र पोलिस तपासात धक्कादायक सत्य समोर आले.

जयश्री आणि तिचा मित्र अक्षय सोनवणे हे शनी अमावस्येच्या रात्री पूजा करण्यासाठी भोंदू योगेश खैरनारच्या आश्रमात गेले होते. पूजा संपल्यानंतर घरी सोडताना योगेशने जयश्रीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. जयश्रीने प्रतिकार करताच तिचा गळा आवळून खून करण्यात आला.

यानंतर आपलं बिंग फुटू नये म्हणून आरोपीने अक्षय सोनवणे याच्याही डोक्यात रॉड मारून हत्या केली. त्याचा मृतदेह जंगलात दफन करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना घटनास्थळी एक नारंगी रुमाल सापडला. श्वान पथकाच्या मदतीने तपासाची दिशा थेट भोंदू योगेश खैरनारच्या आश्रमाकडे वळली. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.

अक्षयचा मृतदेह नेण्यासाठी आरोपीने बैलगाडीचा वापर केल्याचेही तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी योगेश खैरनारला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
भोंदूगिरीच्या नावाखाली सुरू असलेल्या गुन्हेगारीचा हा धक्कादायक प्रकार असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button