AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

विधान परिषदेत एंट्रीनंतर बच्चू कडूंचा अमरावतीत पहिला दौरा; आई-वडिलांच्या समाधीपाशी नतमस्तक, स्वागताला जल्लोष

राजकारणातील मोठ्या निर्णयानंतर बच्चू कडू यांचा अमरावती जिल्ह्यातील पहिला दौरा भावनिक आणि जल्लोषपूर्ण ठरला. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून विधान परिषद सदस्यपद मिळाल्यानंतर बच्चू कडू पहिल्यांदाच आपल्या मातीत दाखल झाले. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी आपल्या मूळ गाव बेलोरा येथून करत आई-वडिलांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.

विधान परिषद सदस्यपदानंतरचा हा पहिलाच गृहप्रवेश असल्याने बच्चू कडूंच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आपल्या राजकीय प्रवासातील नव्या पर्वाची सुरुवात करताना त्यांनी सर्वप्रथम आपल्या मूळ गाव बेलोरा गाठले. तेथे आई-वडिलांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक होत आशीर्वाद घेत त्यांनी पुढील राजकीय वाटचालीची सुरुवात केली. हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक ठरला.

यानंतर बेलोरा गावात बच्चू कडू यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीमुळे संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. समर्थक आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करत परिसर जल्लोषमय केला.

बेलोराहून अमरावतीकडे निघालेल्या बच्चू कडू यांच्या रॅलीत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिक सहभागी झाले. रस्त्याच्या ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. फुलांचा वर्षाव, घोषणाबाजी आणि प्रचंड गर्दीमुळे अमरावतीकडे जाणारा संपूर्ण मार्ग उत्साहाने भरून गेला होता.

बच्चू कडूंचा हा दौरा केवळ राजकीय नव्हता, तर भावनिक आणि शक्तिप्रदर्शनाचा संदेश देणारा ठरला. विधान परिषद सदस्यपदानंतर आपल्या जिल्ह्यात झालेल्या या भव्य स्वागताने बच्चू कडूंची राजकीय ताकद आणि जनाधार पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button