citynewsCrime NewsIndia NewsLatest News

“छत्तीसगडमध्ये घरात घुसून गोळीबार; काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धाकटा जखमी”

छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यात धक्कादायक गोळीबाराची घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून केलेल्या गोळीबारात काँग्रेस नेत्याच्या मुलाचा मृत्यू झाला असून त्याचा धाकटा भाऊ जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (२४ एप्रिल २०२६) मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास बिर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करही गावात घडली. तीन अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून अंधाधुंद गोळीबार केला.

या हल्ल्यात आयुष कश्यप (वय १९) याच्या छातीत दोन गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा धाकटा भाऊ आशुतोष कश्यप (वय १६) याच्या हाताला गोळी लागून तो जखमी झाला आहे. जखमीवर उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

या हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button