citynewsLatest NewsMaharashtraNanded

नांदेड हादरलं! सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नांदेड : शनिवारी (११ एप्रिल) सकाळी नांदेड शहर आणि परिसरात अचानक भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी साधारण ८ वाजून ४५ ते ४६ मिनिटांच्या सुमारास जमिनीला हलकासा कंप जाणवला, ज्यामुळे अनेक नागरिक घाबरून घराबाहेर धावताना दिसले.

या अचानक घडलेल्या प्रकारामुळे काही क्षणांसाठी परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बारसगावसह शहरातील विविध भागांमध्ये लोकांनी घराबाहेर पडत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. सकाळची वेळ असल्याने अनेक जण घरातच होते, त्यामुळे या धक्क्याचा परिणाम अधिक जाणवला.

अधिकृत माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील पांग्रा शिंदे गावाजवळ असल्याचे समोर आले आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी नोंदवण्यात आली आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती नाही. मात्र, अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे नागरिक काही काळ हादरले होते.

तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे सौम्य भूकंप सामान्यतः मोठ्या नुकसानकारक नसतात. तरीदेखील, अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहणे आणि सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button