citynewsIndia NewsLatest News

बेंगळुरूमध्ये दुहेरी मृत्यूची धक्कादायक घटना; पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीची उंच इमारतीवरून उडी

बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे एका आयटी दाम्पत्याच्या दुर्दैवी मृत्यूने परिसर हादरला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीनेही १७व्या मजल्यावरून उडी घेत जीव दिल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

मृतांची ओळख भानू चंदर रेड्डी कुंटा (वय ३२) आणि त्यांची पत्नी बिबी शाजिया सिराज (वय ३१) अशी आहे. दोघेही मूळचे तेलंगणातील असून बेंगळुरूमध्ये नोकरी करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी भानू यांनी आपल्या अपार्टमेंटमधील खोलीत स्वतःला बंद करून गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने शाजिया यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता भानू यांचा मृतदेह आढळला.

पतीचा मृतदेह पाहताच शाजिया यांना मोठा धक्का बसला. याच अवस्थेत त्यांनी १७व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. प्रत्यक्षदर्शींनुसार ही संपूर्ण घटना काही क्षणांत घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाती मृत्यूंची नोंद केली आहे.

दरम्यान, घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नसून, प्राथमिक तपासात कौटुंबिक तणाव, मानसिक दबाव किंवा आरोग्याशी संबंधित कारणांचा तपास केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पोस्टमार्टम अहवालानंतर घटनेमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button