citynewsLatest NewsMaharashtra

हत्तीरोग निर्मूलन मोहिमेला वेग; ‘ट्रिपल ड्रग थेरपी’चा प्रभावी वापर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग देण्यात येत असून या अंतर्गत आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांचा संयुक्त वापर केला जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

केंद्र शासनाने २०२७ पर्यंत भारतातून हत्तीरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, या मोहिमेत महाराष्ट्र शासन सक्रियपणे सहभागी झाले आहे. विशेषतः दुर्लक्षित असलेल्या या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही मोहीम राबवली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, २०१७ मध्ये महाराष्ट्राने विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांना या औषधोपचारासाठी प्राधान्य देण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली होती. त्यानुसार या भागात मोठ्या प्रमाणात उपचार मोहीम राबवण्यात आली.

या उपक्रमामुळे विशेषतः विदर्भातील आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळत असून, हत्तीरोगाच्या निर्मूलनासाठी मोठे पाऊल उचलले जात आहे. तसेच, देशातून हा आजार पूर्णपणे हद्दपार करण्याच्या उद्दिष्टपूर्तीत महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button