Crime NewsJalna

भोकरदन : आठवडी बाजारात पुरवठा विभागाची धडक कारवाई; 10 घरगुती गॅस सिलेंडर जप्त

भोकरदन तालुक्यातील राजूर गणपती येथे रविवारी भरलेल्या आठवडी बाजारात पुरवठा विभागाने अचानक छापेमारी करत हॉटेल व्यावसायिकांवर मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान बाजारातील छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये वापरात असलेले तब्बल 10 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले.

मागील काही दिवसांपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर वापर करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार पुरवठा विभागाने सापळा रचत ही धडक कारवाई केली.

या घटनेमुळे बाजार परिसरात एकच खळबळ उडाली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने अशा प्रकारे घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर न करण्याचे आवाहन केले आहे.

📌 प्रशासनाचा इशारा:
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास कठोर कारवाई केली जाईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button