Crime NewsLatest NewsMaharashtra

सिद्धिविनायक मंदिर मध्ये दानपेटी चोरी प्रकरण; ८ कर्मचारी अटकेत

राज्याची राजधानी मुंबईतील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात दानपेटीतील पैशांवरच कर्मचाऱ्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण ८ जणांना अटक केली असून चोरी मागील दोन महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील दानपेट्या भरल्यानंतर त्या सुरक्षित कक्षात नेल्या जात असताना आरोपी कर्मचारी बोटाच्या कैचीसारख्या साधनाचा वापर करून आतून पैसे काढत होते. ही चोरी एक-दोन वेळा नव्हे, तर संगठित पद्धतीने आळीपाळीने केली जात होती. चोरी केलेली रक्कम आरोपींमध्ये वाटून घेतली जात असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ८० हजार रुपये जप्त केले असून आणखी रक्कम हस्तगत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही आरोपींना पोलीस कोठडी तर काहींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा आणि देखरेख व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button