नागपूर पोलिसांची मोठी पावले; सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी नवी SOP लागू

नागपूर शहरात वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सायबर गुन्हे, तक्रारींचे निवारण आणि तपास प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी नव्या मानक कार्यपद्धती म्हणजेच SOP लागू करण्यात आली आहे…
या नव्या नियमांनुसार आता तक्रार नोंदवण्यापासून ते आरोपींवर कारवाई, बँक खाते होल्ड करणे आणि पीडितांना रक्कम परत देणे या सर्व प्रक्रियेसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत…
नव्या SOP मुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासाला वेग मिळणार असून, पीडितांना न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. तसेच, तक्रारींचे तातडीने निवारण करण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे…
सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर पोलिसांनी घेतलेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे… नव्या SOP मुळे तपास प्रक्रियेत वेग, पारदर्शकता आणि पीडितांना न्याय मिळण्याची शक्यता अधिक बळकट होणार आहे… सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी सतर्क राहा… आणि कोणतीही फसवणूक झाल्यास त्वरित १९३० हेल्पलाईन किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा…



