Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsEducation NewsMaharashtra

अखिल भारतीय युवा महोत्सवात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची दमदार कामगिरी; 13 पारितोषिके पटकावली

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ च्या विद्यार्थी चमूंनी 39 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय युवा महोत्सव स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत एकूण 13 पारितोषिके पटकावली आहेत.

ही स्पर्धा Sathyabama Institute of Science and Technology, चेन्नई येथे 10 ते 14 मार्च दरम्यान पार पडली. या स्पर्धेत विद्यापीठाच्या चमूंनी विविध कला प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर अमरावतीचे नाव उज्ज्वल केले.

स्पर्धेत रांगोळी, हिंदी वक्तृत्व, मिमिक्री आणि वेस्टर्न व्होकल सोलो या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावण्यात आला. तर भारतीय समूहगान, शास्त्रीय नृत्य आणि वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल सोलो या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. माईम आणि कल्चरल प्रोसेशनमध्ये तृतीय, लोकनृत्य, फोक ऑर्केस्ट्रा आणि ग्रुप साँग (वेस्टर्न) मध्ये चतुर्थ, तसेच क्ले मॉडेलिंगमध्ये पाचवा क्रमांक मिळवण्यात आला.

याआधी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मध्य विभाग स्पर्धेत चॅम्पियनशिप मिळवल्यानंतर या यशामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थी कलावंतांनी राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे.

विद्यार्थी विकास विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून अनेक विद्यार्थी कला क्षेत्रात प्रावीण्य मिळवत विद्यापीठाचा नावलौकिक वाढवत आहेत.

या यशामध्ये चमू व्यवस्थापक म्हणून डॉ. शितलबाबू तायडे आणि डॉ. जयश्री कुळकर्णी यांनी, तर साथीदार म्हणून डॉ. निखिलेश नलोडे, श्री प्रशांत ठाकरे, श्री अमोल अढाऊ, श्री प्रकाश मेश्राम, श्री अभिजित भावे आणि श्री अवधुत पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कुलगुरु डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे आणि विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी संपूर्ण चमूचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button