Accident NewsLatest NewsMaharashtraYavatmal

साखरा (दिग्रस) जवळ खासदारांच्या गाडीला अपघात; सुदैवाने सर्वजण सुखरूप

यवतमाळ प्रतिनिधी :
यवतमाळ जिल्हा मधील दिग्रस तालुक्यातील साखरा गावाजवळ खासदारांच्या गाडीचा अपघात झाला आहे. संजय देशमुख — वाशिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे सेनेचे खासदार — कामानिमित्त साखरा येथे गेले होते.

काम आटोपून दिग्रसकडे परत येत असताना त्यांच्या इनोव्हा गाडीला मागून भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका जबरदस्त होता की परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या गाडीत खासदार देशमुख यांच्यासह चार जण प्रवास करत होते. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. खासदार आणि त्यांचे सहकारी पूर्णपणे सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. भरधाव टिप्परमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोठी दुर्घटना टळली… एक गंभीर अपघात सुदैवाने जीवितहानीशिवाय पार पडला. आता या अपघाताचे नेमके कारण काय आणि टिप्पर चालकावर कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button